Skip to main content

Posts

Showing posts from September, 2017

Rangnath Swami (Nazrekar)

रंगनाथस्वामी निगडीकर हे  समर्थ पंचायनातले  एक सत्पुरुष होते. ते दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक होते. मनाने विरक्त असूनही त्यांचा थाट एखाद्या मोठ्या सरदारासारखा असे. ते स्वतः घोड्यावर बसून प्रवास करीत. त्यांच्याबरोबर मोठा लवाजमा असे. वैभवशाली राहण्यामुळे त्यांच्या विरक्तीबद्दल लोकांना नेहमीच शंका वाटत असे. अशा शंकेखोरांनी दोन वेळा  शिवाजी  महाराजांचे मन रंगनाथस्वामींबद्दल कलुषित करण्याचा प्रयत्‍न केला होता. पण रंगनाथस्वामींनी शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण झालेला किंतू काही चमत्कार दाखवून क्षणार्धात दूर केला, अशी आख्यायिका आहे. त्याचे जन्म स्थान हे सांगोला तालुक्यातील नाझरे गाव हे आहे. रंगनाथस्वामींचे पूर्ण नाव रंगनाथ बोपजी कुलकर्णी. त्यांच्या आईचे नाव बयाबाई. बोपजी हे  नाझरे  गावचे कुलकर्णी होते. त्यांच्या तीन मुलांपैकी रंगनाथ हे मधले चिरंजीव होत.  कल्याणी  गावचे  पूर्णानंद  हे  सहजानंदांचे  शिष्य होते. रंगनाथांच्या वडिलांनी या पूर्णानंदांकडून संन्यासदीक्षा घेतली. तेव्हा त्यांचे नाव निजानंद ठेवण्यात आले. रंगनाथांना निजानंदा...