पैसा फक्त एक जगण्याचं साधन आहे! माणसाच्या खिशात भरपूर पैसा आला कि माणसाला वाटत कि आपल्यासारखं सुखी कुणीच नाही,परंतु पैसा जवळ असला तरी आपण आनंदी असल्याची शाश्वती नसते,आणि जरी जवळ पुरेसा पैसा नसला तरीही दु:ख हमखास असतच.खर तर पैसा हे जगण्याचं फक्त साधन आहे.पैसा म्हणजे सर्व काही असे नाही,आणि पैशाशिवाय आयुष्यात काहीच करताही येत नाही आपल्याला पुरेसा पैसा म्हणजे काय? हे आयुष्यात कधीही समजत नाही,आणि त्याहून महत्वाची बाब म्हणजे पुरेसा पैसा म्हणजे नेमके किती? हे एकदा ठरवल आणि तेवढा कमवलाच तरी तो पुरत नाही, आणि पुरेश्या पैश्याची व्याख्या आयुष्यभर समजत नाही. आपल्याला पैसा हा नेहमी आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टाच्या मानाने खूप कमीच मिळतो आहे असच आपल्याला नेहमी वाटत असत. आणि आपल्यापैक्षा कमी शिक्षण किंव्हा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाराला खू जास्त मिळतोय असंही वाटत असत. आपल्याला जो पैसा मिळत नाही तो आपल्याजवळ टिकत नाही, मात्र इतरांकडे बरोबर टिकत असच आपल्याला वाटत असत.कधी-कधी तर आपल्याला आपल्या मुलभूत गरजांनाही कमवलेला पैसा पुरत नाही, परंतु इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला पैसा असतो असं आपल्य...