Skip to main content

श्रीमंत इंग्रजी विरुद्ध गरीब मराठी



सक्तीच्या मराठीचा कायदा खऱ्या अर्थाने परिस्थिती बदलवणारा ठरेल.श्रीमंत इंग्रजी महाराष्ट्र विरुद्ध गरीब मराठी महाराष्ट्र हि भाषिक फाळणी टाळायलाच हवी.
       १९९६ साली ज्ञानपीठकार कवी कुसुमाग्रजांनी स्वतंत्रदेवतेची विनवणी हि कविता लिहली होती, त्यातील वरील चरण हे आज तेव्हापेक्षा अधिक भयावह सत्य ठरताना दिसत आहे.सरकारी धोरणामुळे मोठ्या संख्येने दरवर्षी सुरु होणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा, पालकांचा इंग्रजी शाळेकडचा वाढता कल आणि इंग्रजी हि जागतिक तसेच ज्ञानभाषा आहे, हा समज आणि देशाचे गुंतागुंतीचे भाषिक वास्तव,ज्यामुळे प्रादेशिक भाष्याची होणारी गळचेपी हे उद्याचे भविष्य प्रतिभासंपन्न कविवर्यांनी फार आधी दोन दशकापूर्वी सांगितले होते.तसे होऊ नये हि स्वतंत्रदेवी शासनाला विनवत होतो,पण शासनाने तसेच भारतीय पालकांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे मुंबईसारख्या महानगरात मराठी शाळा बंद पडत आहेत, व हे लोन इतर शहरातही पसरत आहे.
               खरेतर शासनाने मातृभाषेतून शिक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे,ते त्याचे घटनात्मक कर्तव्य आहे. भारतात राज्याची पुनर्रचना भाषिक तत्वावर झाली आहे.नवे संयुक्त महाराष्ट्र-मराठीचे एकसंघ राज्य विदर्भ- मराठवाडा जेंव्हा अस्तित्वात आले, तेव्हां महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठीच्या अभ्युदयाचे स्वप्न पहिले होते. ते असे म्हणाले होते कि जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हां तेव्हां मराठी भाषा माझ्या नजरेसमोर मराठी भाषा भरजरी वस्त्रे लेवून महाराष्ट्राच्या सिहासनावर आरूढ झाली आहे.हे स्वप्न दुश्य स्वरुपात साकारते. आज तीच मराठी भाषा कुसुमाग्रजांनच्या शब्दात सांगायची झाली तर जीर्ण वस्त्रानिशी हाती कटोरा घेऊन मंत्रालयासमोर उभी आहे. हे अस का झाल? यशवंतराव चव्हाण यांनी मराठी हि इथली शासन प्रशासन व लोक्व्यव्हाराची तसेच ज्ञानाची भाषा व्हावी म्हणून जे व जेवढे प्रयत्न केले, ते वगळले तर त्यानंतर कुणीही तेवढ्या हिरहिरीने मुख्य म्हणजे दुर्दुष्टीने केले नाहीत.

Comments

Popular posts from this blog

पैसा ...फक्त एक जगण्याचं साधन...

पैसा फक्त एक जगण्याचं साधन आहे! माणसाच्या खिशात भरपूर पैसा आला कि माणसाला वाटत कि आपल्यासारखं सुखी कुणीच नाही,परंतु पैसा जवळ असला तरी आपण आनंदी असल्याची शाश्वती नसते,आणि जरी जवळ पुरेसा पैसा नसला तरीही दु:ख हमखास असतच.खर तर पैसा हे जगण्याचं फक्त साधन आहे.पैसा म्हणजे सर्व काही असे नाही,आणि पैशाशिवाय आयुष्यात काहीच करताही येत नाही आपल्याला पुरेसा पैसा म्हणजे काय? हे आयुष्यात कधीही समजत नाही,आणि त्याहून महत्वाची बाब म्हणजे पुरेसा पैसा म्हणजे नेमके किती? हे एकदा ठरवल आणि तेवढा कमवलाच तरी तो पुरत नाही, आणि पुरेश्या पैश्याची व्याख्या आयुष्यभर समजत नाही. आपल्याला पैसा हा नेहमी आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टाच्या मानाने खूप कमीच मिळतो आहे असच आपल्याला नेहमी वाटत असत. आणि आपल्यापैक्षा कमी शिक्षण किंव्हा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाराला खू जास्त मिळतोय असंही वाटत असत. आपल्याला जो पैसा मिळत नाही तो आपल्याजवळ टिकत नाही, मात्र इतरांकडे बरोबर टिकत असच आपल्याला वाटत असत.कधी-कधी तर आपल्याला आपल्या मुलभूत गरजांनाही कमवलेला पैसा पुरत नाही, परंतु इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला पैसा असतो असं आपल्य...

Rangnath Swami (Nazrekar)

रंगनाथस्वामी निगडीकर हे  समर्थ पंचायनातले  एक सत्पुरुष होते. ते दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक होते. मनाने विरक्त असूनही त्यांचा थाट एखाद्या मोठ्या सरदारासारखा असे. ते स्वतः घोड्यावर बसून प्रवास करीत. त्यांच्याबरोबर मोठा लवाजमा असे. वैभवशाली राहण्यामुळे त्यांच्या विरक्तीबद्दल लोकांना नेहमीच शंका वाटत असे. अशा शंकेखोरांनी दोन वेळा  शिवाजी  महाराजांचे मन रंगनाथस्वामींबद्दल कलुषित करण्याचा प्रयत्‍न केला होता. पण रंगनाथस्वामींनी शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण झालेला किंतू काही चमत्कार दाखवून क्षणार्धात दूर केला, अशी आख्यायिका आहे. त्याचे जन्म स्थान हे सांगोला तालुक्यातील नाझरे गाव हे आहे. रंगनाथस्वामींचे पूर्ण नाव रंगनाथ बोपजी कुलकर्णी. त्यांच्या आईचे नाव बयाबाई. बोपजी हे  नाझरे  गावचे कुलकर्णी होते. त्यांच्या तीन मुलांपैकी रंगनाथ हे मधले चिरंजीव होत.  कल्याणी  गावचे  पूर्णानंद  हे  सहजानंदांचे  शिष्य होते. रंगनाथांच्या वडिलांनी या पूर्णानंदांकडून संन्यासदीक्षा घेतली. तेव्हा त्यांचे नाव निजानंद ठेवण्यात आले. रंगनाथांना निजानंदा...