पैसा फक्त एक
जगण्याचं साधन आहे! माणसाच्या खिशात भरपूर पैसा आला कि माणसाला वाटत कि
आपल्यासारखं सुखी कुणीच नाही,परंतु पैसा जवळ असला तरी आपण आनंदी असल्याची शाश्वती
नसते,आणि जरी जवळ पुरेसा पैसा नसला तरीही दु:ख हमखास असतच.खर तर पैसा हे जगण्याचं
फक्त साधन आहे.पैसा म्हणजे सर्व काही असे नाही,आणि पैशाशिवाय आयुष्यात काहीच
करताही येत नाही आपल्याला पुरेसा पैसा म्हणजे काय? हे आयुष्यात कधीही समजत
नाही,आणि त्याहून महत्वाची बाब म्हणजे पुरेसा पैसा म्हणजे नेमके किती? हे एकदा
ठरवल आणि तेवढा कमवलाच तरी तो पुरत नाही, आणि पुरेश्या पैश्याची व्याख्या आयुष्यभर
समजत नाही. आपल्याला पैसा हा नेहमी आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टाच्या मानाने खूप
कमीच मिळतो आहे असच आपल्याला नेहमी वाटत असत. आणि आपल्यापैक्षा कमी शिक्षण किंव्हा
लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाराला खू जास्त मिळतोय असंही वाटत असत. आपल्याला
जो पैसा मिळत नाही तो आपल्याजवळ टिकत नाही, मात्र इतरांकडे बरोबर टिकत असच
आपल्याला वाटत असत.कधी-कधी तर आपल्याला आपल्या मुलभूत गरजांनाही कमवलेला पैसा पुरत
नाही, परंतु इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला पैसा असतो असं आपल्याला वाटत आणि हे
वाटण म्हणजे सगळ्याचा नजरेत वाटत असत त्याला कितीही कमवला तरी कमीच वाटत असतो
माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे. मला अजून
जास्त पैसा नको असं समाधानाने म्हणणारा कोणीच नसतो.प्रत्येकाला अजून पैसा आला तरी
गरजा वाढत जातात आणि आलेला पैसा पुरत नाही.
काही जणांना दुसर्याकडून उधार
दिलेला पैसा मात्र कधीच विसरता जात नाही! जे उधारीच तेच मदतीच,तेच दान धर्माचं,तेच
खर्चाच वगैरे. आपल्याला मिळालेल हि आपलच आणि आणि आपण दिलेलं हि आपलच हे फक्त
पैश्याच्या बाबतीत घडत, कारण पैसा हि अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे! पैसा म्हणजेच
लक्षी! पैसा म्हणजेच सर्वस्व तो एकदा दारातून आला तसा हजार खिडक्यानद्वारे पसारही
होतो! पैसा जवळ आला कि खूप छान भारी वाटत. कधी-कधी तर पैसा पैसा एकटाच येत नाही तर
येताना मोठे मोठे आजार देखील घेऊन येतो. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटल
तरी त्यान पोटही भरत नाही आणि सुखही मिळत नाही. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं
तर त्याला अनंत खिडक्यांमधुन बाहेरच जाऊ द्याव लागत पैसा आल्यामुळे मिळणार सुखं
मोठ? कि खर्च केल्यामुळे मिळणार? हे ठरवता येत नाही.कारण पैसा अत्यंत गंमतशीर
गोष्ट आहे.
चोर म्हणू नका आजारपण म्हणू
नका, अपघात म्हणू नका भूकंप म्हणू नका...काय वाट्टेल ते दैव किंव्हा योगायोग समोर
उभे ठसतात, आणि कर्मानं कमावलेल्या पैशाच क्षणार्धात होत्याचं नव्हत होऊ शकत
...कर्म कमावतो आणि देव हिसकावतो. हि पैश्याच्या बाबतीत म्हण असायला हवी!
पैशापाशी पैसा जातो! जिथे
मुळातच खूप पैसा आहे तिथे अजून पैसा जात राहतो जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा
जमेल तेवढ्या लवकर संपत राहतो. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस
आपण खपल्यावर आपण निघून जातो, पैसा मात्र इथेच राहतो.!!!
Comments
Post a Comment