मनुष्याच्या
आयुष्यात सुखाचा भोग असो किंव्हा दुःखाचा भोग! तो मनुष्याला संचित पाप कर्म व
पुण्यकर्म यामुळेच भोगावा लागतो. संतश्रेष्ठ जगतगुरू संत तुकाराम महाराज आपल्या
एका अभंगात प्रमाण देतात कि,
भोंगे घडे त्याग! त्यागें अंगा येती भोग !!
ऐसे उफराटे वर्म! धर्मा अंगी चं अधर्म !!
देव अंतरे ते पाप! खोटे उगवा संकल्प !!
तुका म्हणजे भीड खोटी ! लाभ विचारावा पोटी!!
संतश्रेष्ठ संत
शिरोमणी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचा हा गाथ्यातील अभंग आहे. संत तुकोबाराय
त्यांच्या या अभंगात असे सांगत आहेत कि, एखादा मनुष्य प्रपंच्यातील विषय भोग घेता
असेल आणि त्याला काही काळानंतर त्याचा त्याग करावा वाटला आणि त्या विषयाचा त्याग
केला कि, त्याला लगेच त्या सर्व संचित पाप आणि पुण्य कर्माचा भोग भोगावा लागतो,
म्हणजे एखाद्य वाईट व्यक्तीने वाईट कर्म करीत असताना तो करीत राहिला परंतु त्याने
तो वाईट कर्म न करण्याचा संकल्प केला आणि त्याने ते वाईट करणे सोडून देताच
त्याच्यावर दुःखाचा डोंगर किंव्हा मोठा संकटाचा डोंगर कोसळतो याचाच अर्थ असा कि,
त्याने वाईट कर्माचा त्याग करताच त्याच्या पूर्व कर्माचा भोग समोर उभा राहतो.
संतश्रेष्ठ जगतगुरू तुकोबाराय असेही
सांगतात कि, हे असे उफराटे वर्म म्हणजे उलटे वर्म आहे आणि धर्मा अंगीच अधर्म आहे
ज्या कर्मामुळे देवात आणि भक्तांमध्ये अंतर पडते ते कर्म म्हणजे पाप कर्म! आणि
देवाचे कर्म म्हणजेच सत्कर्म! हे लक्षात घेऊनच भक्ताने नीतीने आणि न्यायाने जगायला
शिकले पाहिजे. खोटे व्यर्थ संकल्प चांगल्या वक्तीने कायमचे सोडून द्यावे.
तुकोबाराय शेवटच्या चरणात असे सांगत आहेत कि खोटे संकल्प, व्यर्थ संकल्प, खोटी भीड न धरता जिथे आपला लाभ बघावा. आणि आपण नीती न्यायाने कर्म करीत जगत रहावे.
तुकोबाराय शेवटच्या चरणात असे सांगत आहेत कि खोटे संकल्प, व्यर्थ संकल्प, खोटी भीड न धरता जिथे आपला लाभ बघावा. आणि आपण नीती न्यायाने कर्म करीत जगत रहावे.
विठोबासी शरण जावे
निजनिष्ते नाम घ्यावे
विठोबाचे शरण जाऊन
त्याचे नाम घेत अखंड चिंतन करत राहण्यातच खरा धर्म आहे, खरा स्वार्थ आहे आणि खरा
लाभ आहे. कारण विठोबाचे नामस्मरण हे फक्त निमित्तमात्र आहे, परंतु त्यामुळे आपल्या
मनात नकारात्मक विचार येत नाहीत. आपण सकारात्मक विचाराने पुढील कार्य करायला
लागते, त्याचे भोग आपणास सकारात्मक मिळते.
Comments
Post a Comment