रेडीओ आणि श्रोता
यांच्यातील मानवी दुवा..माईक कॉम्स मध्ये हिटलरने संघटक आणि प्रचारक यांची नेमकी
कामे काय असतात, हे विस्ताराने सांगितले आहे. त्यात प्रचारकाविषयी तो म्हणतो
बहुसंख्य माणसे मानसिकदृष्ट्या आळसी आणि भिरू असतात, ती निष्क्रिय असल्यामुळे
एखाद्या राजकीय विचारधारेवर विश्वास ठेवण्याचा साधासा प्रयत्न करणे एवढेच
त्याच्यासाठी पुरेसे असते. प्रचारकाचे- प्रोपगंडीस्टाचे काम हेच, कि आपल्या
चळवळीला असे नवनवे अनुयायी मिळतील हे त्याने न थकता पहायचे.
पण असे अनुयायी मिळाल्यानंतर थांबून
चालत नसते त्यांना सतत त्या मार्गावर ठेवणे आवश्क असते. लोकांच्या मनावर,
डोळ्यांवर कानावर आदळत राहिला पाहिजे. तोही एकतर्फी एखाद्या गोष्टीला दुसरी बाजू
असताच कामा नये वायमार रिपब्लिकन नेत्यांनी राष्ट्राची दुर्गती केली म्हणजे
दुर्गतीच केली. त्यांनाही काही चांगल्या गोष्टी केल्या असतील असे चुकुनसुद्धा
म्हणायचे नाही. कारण चांगला प्रोपगंडा तोच, कि जिथे लोकांच्या मनात शंका निर्माण
होण्याला वावच ठेवलेला नसतो.हिटलर म्हणतो – प्रत्येक प्रकारच्या प्रोपगंडाची पहिली
अटच ही आहे,कि आपल्या समोरच्या कोणत्याही समस्येबाबत आपला दुष्टीकोन व्यवस्थितपणे
एक पक्षीय एकाच बाजूला असाच असला पाहिजे. सत्य जर विरोधकांच्या बाजूचे असेल,तर
त्याचा उच्चारही करता कामा नये.आधुनिक वैज्ञानिक प्रगतीने या प्रोपगंडासाठी दोन
सर्वोत्तम माध्यमे दिली.एक रेडीओ.दोन चित्रपट.
रेडीओ हे यातील सर्वात
परिणामकारक मध्यम.तेव्हा अजून घरात दूरचित्रवाणी संच आलेले नव्हते, त्यामुळे
चित्रपट पहायचे तर त्यासाठी उठून चित्रपटगृहातच जावे लागणार. दुसरे मध्यम
वृत्तपत्रांचे तर अनेक जण वृत्तपत्रे वाचतच नाहीत.पुन्हा त्यातील मजकूर समजुन घ्यायचा
तर त्यासठी किमान विचार साक्षरता हवी. एकोणिसाव्या शतकात मुद्रितमाध्यमांचे जे
स्थान, तेच विसाव्या शतकात रेडिओचे आहे. त्यामुळे नाझींची सत्ता आल्यानंतर
गोबेल्सने नभोवाणी प्रक्षेपणाचे सगळे अधिकार त्याच्या प्रोपगंडा मंत्रालयाकडे
घेतले.आता नभोवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कायर्क्रमाचे स्वरूप कोणतेही असो,
त्यांची विषयवस्तू असे ती राष्ट्र आणि राष्ट्रप्रमुखाविषयीचा, आर्य वंशविषयाचा
अभिमान रेडीओचा वापर करीत असताना नाझी प्रोपगंडातज्ञांच्या लक्षात एक बाब आली होत,
कि वक्ता आणि श्रोता यांतील मानवी बंध नाही.
नाझी सत्तेने लोकांच्या
हाती रेडीओ दिले खरे पण त्यावरून काय ऐकायचे याचे अधिकार मात्र स्वत:कडेच ठेवले.येथे
एक बाब लक्षात घेतली पाहिजे; कि फॉरेस्ट व्यवस्तित प्रोपगंडा हा हिंसेसा पर्याय
नसतो.तो हिंसेसाच एक भाग असतो.नाझी जर्मनीत सरकार मान्यता प्राप्त नभोवाणी केंद्रे
सोडून अन्य काहीही ऐकले. उदा. बीबीसी सारखी परकी केंद्रे, तर त्यांची शिक्षा एकच
होतो छळछावणीत रवानगी पण त्याच वेळी नाझी नभोवाणीचे प्रक्षेपण अन्य देशांतही
करण्यात येत होते.त्यावरून केल्या जाणाऱ्या प्रोपगंडाचा हेतू एकच असे, शत्रूराष्ट्रात
अपमाहिती पसरवणे, शत्रूसैनिकांचे मनोधैय खच्ची करणे.जर्मन रेडीओवरून सादर केला
जाणारा होम स्वीट हा कार्यक्रम हे त्याचे एक उदाहरण. अमेरिका सैनिकांना उद्देशून
तो कायेक्रम केला जाई. अशा प्रकारे विविध मालिका सादर केल्या जात.
Comments
Post a Comment